आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:हजरत ख्वाजा शमशोद्दीन यांच्या‎ उरूसाची पंखा मिरवणुकीने सुरुवात‎

उस्मानाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रसिद्ध हजरत ख्वाजा‎ शमशोद्दीन यांच्या ७१८ व्या वार्षिक‎ उरूसाला शनिवारी सायंकाळी सात‎ वाजता पंखा मिरवणुकीने प्रारंभ झाला.‎ या मिरवणुकीस तालीम गल्लीपासून‎ प्रारंभ झाला. यावेळी मुतवल्ली, मानकरी‎ आणि पुजारी उपस्थित होते. तसेच‎ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीने यास‎ प्रारंभ झाला. रात्री उशिरा ही मिरवणूक‎ शहरातील विविध भागातून दर्ग्यामध्ये‎ पोहोचली.‎

दहा दिवस सुरू राहणाऱ्या या‎ उरुसासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी‎ करण्यात आली आहे. दर्गा आणि वक्फ‎ बाेर्डाच्या समन्वयाने हा महोत्सव संपन्न‎ होणार आहे. यासाठी पोलिस प्रशासन,‎ नगर पालिका आणि महसूल विभागाने‎ एकत्र येत याचे पूर्ण नियोजन केले‎ आहेत. गेली तीन वर्ष काेरोनाचे सावट‎ असल्याने हा उरूस होऊ शकला‎ नव्हता.

मात्र, यंदा सर्वच यात्रांना आणि‎ सार्वजनीक, धार्मिक, सामाजिक,‎ राजकीय कार्यक्रम घेण्यास परवानगी‎ देण्यात आल्याने मोठ्या उत्साहाचे‎ वातावरण शहरात बघावयास मिळत‎ आहेत. यासाठी नगर पालिकेने‎ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले‎ आहेत. साफ-सफाई, पाण्याची व्यवस्था‎ आणि विद्युत व्यवस्था निर्माण करुन‎ दिली आहे. तीन वर्षानंतर होणाऱ्या‎ उरूसासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची‎ उपस्थिती राहणार असल्याने‎ पोलिसांकडून ही नियोजन करण्यात‎ आले आहेत. तसेच दर्गा समिती आणि‎ पुजाऱ्यांनी त्यांच्या दहा दिवसांच्या‎ धार्मिक कार्यक्रमांचेही नियोजन केले‎ आहे. या दहा दिवसात शहरातील गाजी‎ मैदान आणि दर्गा परिसरात सांस्कृतिक,‎ क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमांचेही‎ आयोजन करण्यात आले आहेत. गेल्या‎ पंधरा दिवसांपासून या उरुसाच्या विविध‎ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले‎ आहे. यानिमित्त शहरात उत्साहाचे‎ वातावरण निर्णाण झाले आहे.‎

पहिल्याच कार्यक्रमाला गर्दी, उत्साह‎
ऊरुसाचा पहिला धार्मिक कार्यक्रम शनिवारी पार पडला. पहिल्या‎ दिवशी पंखा मिरवणुकीने दहा दिवसांच्या महोत्सवाची सुरुवात तालीम‎ चौकातून करण्यात आली. तेथून विजय चौक, खडकपुरा रोड,‎ सिव्हील हॉस्पीटल, मारवाडी गल्ली, मेहबूबगंज, माऊली चौकातून‎ दर्गा रोडने दर्गा येत या मिरवणुकीची सांगता करण्यात आली.‎

सर्व तयारी झाली पूर्ण, ‎सहभागी व्हावे‎
ऊरुसाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यंदा मोठ्या‎ प्रमाणात धार्मिक व सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचे आयोजन‎ करण्यात आले आहेत. यात सर्वांनी सहभागी होऊन यात्रेची शोभा‎ वाढवावी. आतापासून दुकानांची रेलचेल सुरू झाली आहे. मुख्य‎ संदल मिरवणुकीसाठी प्रशासन, वक्फ बोर्ड व दर्गा पुजारी,‎ मानकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.‎ - सय्यद रफीक, सदस्य, दर्गा उत्सव समिती.‎

कार्यक्रम, दिनांक, वार व वेळ‎
पंखा मिरवणूक – चार फेब्रु. - शनिवार, सायंकाळी‎ सात ते रात्री नऊ सेहरा मिरवणूक – पाच फेब्रु. -‎ रविवार, सायंकाळी सात ते रात्री नऊ गुसल पाणी‎ मिरवणूक – सहा फेब्रु. - सोमवार, सायंकाळी सात ते‎ रात्री नऊ संदल मिरवणूक – सात फेब्रु. - मंगळवार,‎ सायंकाळी सात ते रात्री दहा चिरागा रोशन, कव्वाली -‎ आठ फेब्रु. - बुधवार मध्यरात्री जिरायत व कव्वाली -‎ नऊ फेब्रु. - गुरुवारी सायंकाळी सात ते दहा व दहा‎ नंतर वाअज, बयाण, नाते शरीफ – १० फेब्रु. -‎ शुक्रवारी रात्री दहा पासून पुढे मुशायरा - ११ फेब्रु. -‎ शनिवार, रात्री दहा नंतर गझल – १२ फेब्रु.- रविवारी‎ रात्री दहा नंतर जंगी कुस्ती स्पर्धा - १३ फेब्रुवारी -‎ सोमवारी दुपारी ३.३० ते सहा आतिषबाजी व उरुस‎ समाप्ती - १३ फेब्रुवारी - सोमवार, रात्री ९.३०.‎

बातम्या आणखी आहेत...