आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधाराशिव तालुक्यातील तेर येथील हजरत खाजा सुलेमान रहे.अलै.यांच्या उरूसास उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार दि.१४ मार्च रोजी दरबार मोहल्ल्यातून दोन मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या संदल मिरवणुकीस प्रारंभ झाला. कोरोना महामारीनंतर पुन्हा तोच उत्साह दिसून आला. शेर ए हिंद ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संदल मिरवणूक प्रसंगी धाराशिवचे माजी नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर, माजी सरपंच मुन्ना खटावकर यांच्या डोक्यावर संदल देऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला.
यावेळी सोसायटीचे व्हा.चेअरमन,रतन नाईकवाडी,अप्पासाहेब चोगुले, ग्रा.पं.सदस्य बापू नाईकवाडी, अमोल कसबे, अविनाश आगाशे, रणधीर सलगर, रियाज कबीर,मकसूद काझी, फैसल काझी, बाबुराव नाईकवाडी, मंगेश पांगरकर आदीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संदल मिरवणुकीस प्रारंभ झाला.
बबलू मोमीन युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संदल मिरवणुकीचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे तेरच्या सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव नाईकवाडी ,पद्माकर फंड रूग्ण कल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन पद्ममाकर फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी माजी उपसरपंच रविराज चौगुले ,विठ्ठल लामतुरे,विलास रसाळ जयेश कदम ग्रा.पं.सदस्य अजित कदम, नवनाथ पसारे अभिमन्यू रसाळ,, इर्शाद मुलाणी, शहाबाज मुलाणी, जहांगीर कोरबू यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मुस्लिम समाजातील तरूणांनी विविध रंगाचे फेटे घालून डी.जे तालावर नृत्य केले. संदल मिरवणूक रात्री सुलेमान टेकडीवर पोहोचली. यावेळी बीट अमंलदार प्रदीप मुरळीकर यांच्यासह ढोकी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी तेर येथे हा उत्सव होतो. सर्व धर्मांचे लोक आवर्जून उपस्थित असतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.