आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्त्यांचा फड:हजरत सय्यद बाशा यात्रेत रंगला कुस्त्यांचा फड; महाराष्ट्रासह कर्नाटकातील पैलवानांनी सहभाग

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात हजरत सय्यद बाशा दर्गा ऊरुसनिमित्त सोमवारी (दि ०४) सायंकाळी झालेल्या कुस्त्यांच्या फडात महाराष्ट्रासह कर्नाटकातील पैलवानांनी सहभाग घेत स्वःतच्या अंगी असलेल्या डावपेचांनी रंगत वाढवली.

हजरत सय्यद बाशा दर्ग्याच्या ऊरुसानिमित्त पंच समितीने कोरोना काळात खंडित झालेली कुस्त्यांची परंपरा कायम ठेवली आहे. देवस्थानच्या शेतात सुरू झालेल्या कुस्त्याच्या फडात प्रारंभी लहानग्या पेहलवालांनी कुस्त्याच्या कसरतीत सहभाग घेऊन सर्वांना चकित केले. कर्नाटकाच्या सूर्यकांत मोटे यांनी उमरग्याचा सुनील काळे यांचा पराभव केला. तर बेळंबगी (ता आळंद) येथील वसीम इनामदार याने वागदरी (ता अक्कलकोट) येथील शिवा सोनकवडे याला पहिल्याच डावपेचात चित केले. माडजचा शेखर मारेकर याने रामलिंग मुदगडच्या सौदागर माळीचा पराभव करून तीन हजाराचे बक्षिस घेतले. चितली (ता आळंद) च्या धनराज गाडे यांनी कुन्हाळीच्या सतीश नरवटे यांचा पराभव केला.

रामलिंग मुदगडचा राम पुजारी व धनराज गाडे यांची कुस्ती बरोबरीत काढण्यात आली. संदिप नरवटे, सतीश नरवटे, सचिन एरंडे (कुन्हाळी), वीरभद्र स्वामी भुसणी,श्रीकांत कांबळे, मनोज सुर्यवंशी (रामलिंग मुदगड), दिपक पिस्के उमरगा, महादेव घोडके (अणदूर) यांच्यासह पन्नासहून अधिक मल्ल यांनी कुस्त्या जिंकल्या. ऊरुससमितीच्या वतीने सर्व मल्लांसाठी एकूण साठ हजाराचे बक्षिस देण्यात आले. ऊरूस समितीचे अध्यक्ष जाहेद मुल्ला, उपाध्यक्ष सय्यद मुल्ला, वहीद मुल्ला, मुसा मुल्ला, अतिक शेख, लतिफ सास्तुरे, यांच्यासह ऊरुस कमेटी सदस्यानी पुढाकार घेतला.पंच म्हणून राजेंद्र पाटील, संदिप माकणे, शिवाजी त्रिकोळे, दिपक पिस्के यांनी काम पाहिले.

अमर मसरे व सचिन मुळे यांची कुस्ती बरोबरीत
उमरग्याचा मल्ल अमर मसरे व रामलिंग मुदगडचा सचिन मुळे यांच्यात शेवटची पाच हजार रुपयाची कुस्ती युवानेते किरण गायकवाड, समिती अध्यक्ष जाहेद मुल्ला, अस्लम शेख, आकाश शिंदे यांच्या हस्ते लावण्यात आली. दोन्हीही मल्ल तेवढ्याच तोडीचे होते,अत्यंद चिवट पद्धतीने डावपेच टाकत सुरू होती. शेवटी पंचाने कुस्ती बरोबरीत सोडविली.

बातम्या आणखी आहेत...