आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरगा:हजरत सय्यद बाशा यात्रा, संदल मिरवणुकीचे आयोजन

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील हजारो हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत सय्यद बाशा दर्गा यात्रेनिमित्त शनिवारी (दि. २) सायंकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली. कोरोनाचे निर्बंध उठवल्याने रविवारी (दि. ३) चिरागनिमित्त शहरासह परिसरातील भक्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

शनिवारी सांयकाळी चार वाजता वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी मानकरी विजयकुमार पाटील यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली. त्यानंतर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सांयकाळी विनावाद्य संदल शरिफ मिरवणूक काढण्यात आली. रविवारी सकाळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी दर्ग्यातील “मजार”ला पाणी घातले. चिराग आणि ऊर्सनिमित्त दिवसभर व रात्री दहापर्यंत हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

ऊरूस समिती अध्यक्ष जाहेद मुल्ला, उपाध्यक्ष सय्यद मुल्ला, असलम शेख,सत्तार मुल्ला, महेबुब मुल्ला, महमदसाब सास्तुरे, राजू कुंभार, अविनाश काळे, रसुल शेख,महेबुब उजळंबे, बबलू बलसुरे, मुसा मुल्ला, मशाक फुलारी, जब्बार मुल्ला, बाबू मुल्ला, फिरोज बाशिंदे, अल्लाउद्दीन उजळंबे, कैलास काळे, रज्जाक शेख, इस्राईल शेख, इब्राहीम मुल्ला, निसार मुल्ला आदींनी ऊरुस यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...