आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य शिबिर‎:भटक्या समाजातील‎ बालरूग्णांसाठी आरोग्य शिबिर‎

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भटके-विमुक्त‎ समाजातील बाल‎ रुग्णांसाठी चौथे आरोग्य‎ शिबीर आज‎ दि.०५-०२-२०२३ रविवार‎ रोजी नळदुर्ग येथे स्वामी‎ विवेकानंद इंग्लिश स्कूल‎ येथे संपन्न झाले.‎ अखिल भारतीय‎ बालरोग तज्ज्ञ संघटना,‎ उस्मानाबाद शाखा व‎ भटके-विमुक्त विकास‎ प्रतिष्ठान संचलित‎ पालावरची शाळा ह्या‎ उपक्रमाच्या संयुक्त‎ विद्यमाने हे आरोग्य शिबिर‎ घेण्यात आले.‎ मरगम्मा वस्ती, पाथरवट‎ वस्ती व वैदू वस्ती नळदुर्ग‎ तसेच डवरी गोसावी वस्ती‎ जळकोट येथील १२०‎ मुलांची मोफत वैद्यकीय‎ तपासणी करून‎ औषधोपचार करण्यात‎ आले.‎

तसेच मुलांना खाऊ व‎ शालेय साहित्य वाटप‎ करण्यात आले.‎ प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ‎ अभय शहापूरकर,‎ डॉ.अभय पाटील व‎ डॉ.प्रणिता गडेकर यांनी‎ बालकांची तपासणी केली‎ व बालकांच्या आरोग्या‎ संदर्भात पालकांना‎ मार्गदर्शन केले.‎

फार्मसिस्ट श्री.सांगळे व‎ जाधवर यांनी सहकार्य‎ केले.‎ शिबीर यशस्वी‎ करण्यासाठी पालावरच्या‎ शाळेच्या कार्यकर्त्यां‎ मीराताई मोटे, कविता ताई‎ वाघे,व इतर कार्यकर्ते यांनी‎ परिश्रम घेतले.‎ भटके विमुक्त विकास‎ परिषदेचे संघटक प्रा.लक्ष्मण‎ सुपनार व प्रमोद शिंदे यांनी‎ शिबीराचे संयोजन केले.‎

बातम्या आणखी आहेत...