आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२३४ विद्यार्थ्यांची तपासणी:तलमोड विद्यालयात आरोग्य तपासणी

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय व मुळज प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे तालुक्यात तलमोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात सोमवारी (दि २९) विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.२३४ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये किमान दोष असणारे ३५, संदर्भीय चार विद्यार्थी तपासणी आढळून आले आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना गोरगरीब बालकांसाठी संजीवनी ठरत असून ‘आरबीएसके’ ची ही मोहीम आणखी जलद होण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयांतर्गत प्रत्येक शैक्षणिक सत्रात दोन टप्प्यांत आरोग्य तपासणी केली जाते. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या आजारांचे निदान केले जाते. यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ टी. एस. राठोड, डॉ. डी. एस. माशाळकर, डॉ. ए. टी. फड, डॉ. एम. टी. सातपुते आदींनी आरोग्य तपासणी केली यावेळी आठवी ते दहावीतील २३४ विद्यार्थ्यांची तपासणी केली.

त्यात ३५ मुले किरकोळ दोषी आढळून आली असून त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले तर चार मुले गंभीर आढळून आल्याने त्यास उपचारास उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शाळेतील मुले- मुलींची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे उपचार करणे त्यांच्या कुटुंबीयांना शक्य नाही, अशांना या शिबिराचा फायदा आहे.

बातम्या आणखी आहेत...