आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:ग्रामपंचायत मैदानात आरोग्य तपासणी शिबिर; दाळिंबमध्ये आरोग्य तपासणी शिबिरात विविध आजारांची तपासणी

दाळिंब16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील दाळिंब ग्रामपंचायतीच्या वतीने साई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून रोजी ग्रामपंचायत मैदानात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये दमा, मुतखडा, मेंदूचे विकार, प्लास्टिक सर्जरी, लहान बाळाचे उपचार, श्वसनाचे विकार, हाडाचे ऑपरेशन, आतड्याचे उपचार, विषबाधा, डेंग्यू मलेरिया, रक्ताचे सर्व आजार संबंधित तपासणी करण्यात आली. तसेच हॉस्पिटल माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देण्यात आली. या वेळी डॉ. मुगळे, डॉ. पाटील, डॉ. ख्याडे, डॉ. तावशीकर आदी डॉक्टर व त्यांचा स्टाफ होता.

तपासणी शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, सरपंच सोमनाथ कुंभार, ग्रामसेवक सुधिर कदम, धीरज इंगळे, हिराजी पाटील, दयानंद देवकते, खय्युम चाकुरे, ओमप्रकाश टिकांबरे आदी उपस्थित होते.कोरोना काळानंतर आरोग्य तपासणी महत्वाची झाली असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध संस्थांच्या वतीने अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशा शिबिरांना चांगला प्रतिसाद आहे. ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी रुग्णालयाची सोय असतेच असे नाही. अशा शिबिरांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही मोलाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...