आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वाकडीत 225 जणांची आरोग्य तपासणी; तेरणा जनसेवा केंद्र व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पद्मसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब तालुक्यातील वाकडी (केज) येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात २२५ जणांची तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे आबासाहेब रणदिवे (भाजप अनु-जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष), बाबासाहेब रणदिवे, अंगद कोल्हे, राजाभाऊ पुरी, गणेश कोल्हे, सुनिल ताटे (कामगार मोर्चा मराठवाडा अध्यक्ष), सरपंच परिमला कोल्हे, श्रीमंत कोल्हे, संजय रणदिवे, वासुदेव कुरुंद, चंद्रकांत पाटील, दिलीप रणदिवे, आशा कार्यकर्ती निर्मला पाटील, मनीषा कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुंबईचे डॉ. अजित निळे, डॉ. नीलेश येणापुरे, डॉ. ऋषिकेश जाधव, डॉ. स्वप्निल नायक, डॉ. शुभम सिंगटकर, डॉ. परवीन सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले.

या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरिक, बालकांनी उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ (जनसंपर्क अधिकारी), नामदेव शेळके (कळंब तालुका जनसेवा केंद्रप्रमुख), पवन वाघमारे, निशिकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...