आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी‎:मुरूम पोलिस कर्मचाऱ्यांची‎ केली आरोग्य तपासणी‎

मुरूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गुरुवारी‎ (दि.१५) मुरूम पोलिस ठाण्यातील अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून‎ औषधोपचार करण्यात आले. उपविभागीय पोलिस‎ अधिकारी रमेश बरकते, सहाय्यक पोलिस‎ निरीक्षक डॉ. रंगनाथ जगताप, सपोनि पवन इंगळे‎ यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.‎ यावेळी सी. बी. सी, बी पी, शुगर आदींची तपासणी‎ करून एचआयव्हीबाबत समुपदेशन करण्यात‎ आले.

या शिबिरात अधिकाऱ्यांसह २५ पोलिस‎ बांधवांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार‎ करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.‎ सत्यजित डुकरे, डॉ. तेजस्विनी सोनवणे,‎ समुपदेशक संतोष थोरात, सुजित जाधव,‎ विजयकुमार भोसले, उमेश लोखंडे,‎ अधिपरिचरिका शीतल सुरवसे, पुष्पा गोरे, गजानन‎ ठोंबरे आदी उपस्थित होते. यामुळे कर्मचाऱ्यांना‎ आरोग्य राखण्यास मदत होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...