आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील तांबेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात डॉ. अमोल घुले फाउंडेशनकडून शिबीरात ३९० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तालुक्यातील तांबेवाडी येथे भगवान बाबा मंदिरासमोर भव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आले आहे.येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन गुरुवार दि ५ रोजी करण्यात आले होते.
तांबेवाडी येथील शिबिरामध्ये एमडी मेडिसिन डॉ.अमोल घुले , नेत्ररोग तज्ञ डॉ.अभिषेक चौधरी , स्त्रीरोग तज्ञ डॉ. रावलिया पुरी , बालरोग तज्ञ डॉ. नितीन पाटील , अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रियांक कलथिया यांनी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून मोफत तपासणी केली . या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या ३९० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी डॉ अमोल घुले फाउंडेशन मुंबईच्या वतीने मोफत तपासणी करून गोळ्या औषधे देण्यात आली.
ग्रामीण भागातील गरजू कुटुंबाना उपचारासाठी मदत मिळावी यासाठी फाउंडेशच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ३२ गावात हे शिबीर पार पाडले आहेत . शिबीर यशस्वी करण्यासाठी सरपंच कल्पना मुंढे , हभप संतोषकुमार मुंढे , पद्माकर मुंढे , ग्रामसेवक डी. एम. पुराणिक , सचिन जाधवर , खंडू जाधवर , सौरभ संक्रांते ,तुकाराम जाधवर , सुदर्शन महाजन व इतरांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.