आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात कलदेव निंबाळा ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि.२) सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयाच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ५२३ महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. संबंधितांना आवश्यकतेनुसार सल्ला देत उपचार करण्यात आले. स्पर्श ग्रामीण रुग्णालयात गरीब, गरजू व एड्सग्रस्त रुग्णसेवा करत आरोग्य सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
स्पर्श रुग्णालयात शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट टीमवर्क, निगराणी, देखरेख, रूग्ण व नातेवाइकांशी आस्थेवाईकपणा, अद्ययावत विपुला माता, बाल संगोपन, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष व सुसज्ज शस्त्रक्रियागार, स्वच्छतेसह विविध दर्जेदार सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे परिसरातील ३०० गावातील बालकांसह महिला पुरूष रुग्ण उपचारासाठी येतात. मोबाइल व्हॅनद्वारा भूकंपग्रस्त गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी, सल्ला व उपचार करण्यात येत आहे.
गुरुवारी कलदेव निंबाळा येथे गावातील १८ वर्षांवरील ५२३ महिला व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मोफत आरोग्य तपासणीत रक्तदाब, मधूमेह व अन्य आजारांवरील तपासणी करुन सल्ला व उपचार करण्यात आले. उर्वरित सर्वच ग्रामस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली.
तपासणीसाठी डॉ. सुनिता चक्करवार, पल्लवी औटे, फार्मासिस्ट कृष्णा यादव, अंजुम इनामदार, लॅब टेक्निशियन अथर्व कुलकर्णी, आरोग्य सेविका शुभांगी गायकवाड, मनोहर क्षीरसागर यांनी काम पाहिले. सामाजिक कार्यकर्ते देविदास पावशेरे यांनी स्पर्श रुग्णालयाचे आभार मानले. यावेळी भागवत लढ्ढा, उत्तम सरवदे, नागनाथ बिराजदार, गजराबाई ढोणे, चंपाबाई बलसुरे, मनोहर हिरवे आदी उपस्थित होते.
रक्तदाब, मधूमेह, अन्य तपासणी
१८ वर्षांवरील ५२३ महिला व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मोफत आरोग्य तपासणीत रक्तदाब, मधूमेह व अन्य आजारांवरील तपासणी करुन सल्ला व उपचार करण्यात आले. उर्वरित सर्वच ग्रामस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.