आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन मेळावा:देवधानोऱ्यात गजानन शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

कळंब10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देवधानोरा येथील गजानन विद्यालय देवधानोरा या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तालुक्यातील देवधानोरा येथील गजानन विद्यालयामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत पथक क्र. २ आयोजित उपजिल्हा रुग्णालय कळंब यांच्याकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासनीस व किशोरी मार्गदर्शन मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आला हाेता.

या वेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. एस. जी. शिंदे, वैद्यकिय अधिकारी डॉ. एस. आर मोहोळकर, औषध निर्माण अधिकारी ए. एस. बाबर, परिचारिका एस. के. लोडे यांनी गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांची व किरकोळ आजार असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थ्यांनी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांचे सत्कार करून कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...