आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक एड्स सप्ताहानिमित्त सोमवारी (दि.१२) विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना व ग्रामीण रुग्णालय मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.मुख्य शेतकी अधिकारी अतुल राखेलकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य शिबिरात ऊसतोड कामगार, वाहन चालक, महिला कामगारांची रक्तदाब, मधुमेह, सीबीसी आदी तपासणी करण्यात आली.
तसेच एचआयव्ही बद्दल समुपदेशन करण्यात आले. या शिबिरात एकूण १२८ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक संतोष थोरात, सुजित जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजयकुमार भोसले, उमेश लोखंडे, अधिपरिचारिका शितल सुरवसे, आकाश घोडके, पवन पवार, साखर कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक कल्याणी चौघुले, हेड टाइम किपर आनंद मनाळे, गेस्ट हाऊस इन्चार्ज शिवराज सोलापूरे, सुभाष मालवडे, मुख्य लिपिक बालाजी वडजे, संगणक ऑपरेटर अंबिका सोळशे, सिव्हिल इंजिनिअर सोनाली भूसनगे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.