आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये कोरोनाने उद्रेक सुरू केला असून देशातही निरंक असलेल्या जिल्ह्यात रुग्ण आढळत आहेत. यामुळे शासनाकडून सतर्कतेच्या सूचना दिल्या असून जिल्हा आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर, औषध आदी सुविधांची चाचपणी करत आहे. यामध्ये ऑक्सिजनचे लहान मोठे आठ प्रकल्प सुस्थितीत असल्याने प्रति दिनी जवळपास ७० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार असून १० हजार रेमडेसिव्हिर आहेत. गरजेनुसार इतर औषधांची उपलब्धता करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रभाव पुन्हा वाढत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. या धोक्याच्या अनुषंगाने प्रशासनही अर्लट झाले असून जिल्हा आरोग्य विभागाला तयारीच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीने ऑक्सिजन, व्हेंटिलेर बेड, औषधांची उपलब्धता आहे की नाही याची चाचपणी सुरू आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत १९५ तर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात ४५ बेड उपलब्ध करता येतात. मात्र, सध्या प्रत्यक्षात १२० बेडची तयारी असून यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात ५३ बेडचा समावेश आहे.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची तयारी
चीनमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने व देशातील काही जिल्ह्यातही नवे रुग्ण आढळत आहेत. यामुळे वरिष्ठ स्तरावरून तयारीबाबत सूचना आल्या आहेत. त्याप्रमाणे ९ पैकी ८ ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प सुस्थितीत असल्याने प्रति दिनी ७० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळू शकातो. व्हेंटिलेटर बेडचे नियोजन केले असून १० हजार रेमडीसीवर आहेत. अन्य औषधांसह तांत्रिक बाबींचे नियोजन सुरू आहे.-डॉ. इस्माइल मुल्ला, नोडल अधिकारी, कोविड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.