आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारांबळ:सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस; भाविकांसह व्यावसायिकांची तारांबळ

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे भाविकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली. तसेच काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान होणार आहे.

संपूर्ण नवरात्रात अपवाद वगळता पावसाने उघाड दिली होती. यामुळे चांगली यात्रा होऊन भाविकांसह व्यावसायिकांना दिलासा मिळाला. मात्र, ऐन अश्विन पोर्णिमा यात्रेत पावसाने हजेरी लावल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. गुरुवारी तसेच शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे भाविकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली असून पावसामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...