आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंजा येथील शेतकऱ्यांचे निवेदन:अतिवृष्टीने पिके धोक्यात;  सरसकट अनुदान द्या

परंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खरीप हंगामातील पिके सततच्या पावसामुळे धोक्यात आल्याने शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी भोंजा येथील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद व तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात जुलैमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील उडीद, सोयाबीनसह इतर पिके पिवळी पडली असुन वाढ खुंटली आहे.

अनेक भागात पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरसकट अनुदान द्यावे. या वेळी जिल्हा कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद यांच्यासोबत लघुउद्योजक गणेश नेटके यांनी खरीप हंगाम २०२० व २०२१ पीकविमा थकीत रक्कम, अनुदान आदी विषयांवर चर्चा झाली. उपसंचालकांनी शेतकऱ्यांना २०२० खरीप हंगाम व २०२१ मधील ५० टक्के विमा निधी न्यायप्रविष्ट मधून दिलासा मिळेल असे सांगितले. या वेळी मंडळ अधिकारी कैलास देवकर, सरपंच अमीर शेख, लघुउद्योग गणेश नेटके, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापनचे अमोल पाटील, लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण, बक्सुभय शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...