आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:मंगरुळ मंडळामध्ये अतिवृष्टी ; तेर-डकवाडी रोडवरील पूल गेला वाहून

उस्मानाबाद / तेर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून गुरुवारी (दि.४) विविध भागात दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर वाढल्याने तेर-डकवाडी रोडवरील पुल वाहून गेला असून शेतात सगळीकडे पाणी साचले. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार तुळजापूर तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेल्याने नुकसान झाले.

जुलैनंतर ऑगस्टमध्येही पावसाचा जोर कायम असून गुरुवारी काही भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे यंदाचा खरीप हंगामही धोक्यात आला आहे. दमदार पावसाने तेर डकवाडी रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक खोळंबली. गतवर्षीच्या पावसातही हा पूल वाहून गेला होता. त्यावर मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी केली होती. तुळजापूर तालुक्यात मंगरूळ मंडळात अतिवृष्टी झाली असून तुळजापूर, जवळा, सलगरा, सावरगाव मंडळात ५० ते ६४ मिमी पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...