आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात काही भागात अवकाळी, पुर्व मोसमी व रोहिणी नक्षत्रात झालेल्या पेरणी उपयुक्त जोरदार पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र पेरणीनंतर कोवळे अंकुर पाण्याच्या प्रतीक्षेत असताना मृग नक्षत्रात गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरुवात झाल्याने शनिवारी वातावरणातील बदलाने तासभर झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
तालुक्यातील खरीप हंगामात एकूण ८७ हजार हेक्टर क्षेत्र असून मान्सून पुर्व रोहिणी नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी येणाऱ्या पावसाच्या भरवश्यावर पेरणी केली. पेरणी होवून पंधरा दिवस लोटले तरी पाऊस होत नसल्याने मृग नक्षत्र शेवटचे टप्प्यात आले तरी पाऊस येण्याचा अंदाज दिसत नसल्याने कोवळी पिके व शेतकरी अडचणीत आल्याने दुबार पेरणी संकट निर्माण झाले होते. खरीप पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांनी पदरमोड करत पेरा केला. उगवलेले कोवळे अंकुर पावसाअभावी करपून जात असताना मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारी दुपार पासून सुरू झालेल्या एक तास जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून वातावरणात बदल झाला आहे.
आर्द्रा नक्षत्राची प्रतिक्षा
उर्वरित क्षेत्रातील पेरणीसाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली असली तरीही पाऊस सर्वदूर झाला नसल्याने शेतकऱ्यांना आर्द्रा नक्षत्राचे पावसाची प्रतिक्षा आहे. तालुक्यात भुयार चिंचोली, डिग्गी, मुळज, तुरोरी व तलमोड परिसरात जोरदार पाऊस झाला. दरम्यान रविवारी रात्री भुयार चिंचोली परिसरात पावसाला सुरुवात झाली होती. सर्वदूर पाऊस झाला नसल्याने दमदार पाऊस होण्याचे प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी हातउसने आणि पदरमोड करीत पेरणी केली. निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हतबल झाला असताना त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे टाकल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.