आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण करणार:नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत करा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी उपोषणाचा इशारा

नळदुर्ग13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलैमध्ये सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा. तसेच २०२० चा पीक विमा तत्काळ द्या. बँकेचे नियमित हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन निर्णयानुसार ५० हजार रुपये १५ ऑगस्टपूर्वी जमा करावे. अन्यथा शेतकरी संघर्ष समिती स्वातंत्र्यदिनी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार.

निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे खरिपातील पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. याचे तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी. तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२० चा पीकविमा द्यावा. निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, दिलीप जोशी, व्यंकट पाटील, ज्ञानोबा सुरवसे, चंद्रकांत शिंदे, महादेव बिराजदार, गणपती घोडके, राजाराम नाईक, काशीनाथ काळे, बंडू मोरे, तोलू करीम शेख, खुशालसिंग ठाकूर, जयसिंग ठाकूर, प्रेमसिंग ठाकूर, महादेव बिराजदार, मकबुल मुल्ला, सैफन मुल्ला, दिलीप पाटील, लक्ष्मण निकम यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...