आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बेळंब या गावात जिंतूर तालुक्यातील मोहाडी या गावातील रहिवासी शामराव गडदे हा मानसिक आजाराने त्रस्त झालेला भटकत आल्याची माहिती प्राप्त होताच अवघ्या दहा मिनिटांत पोलिस पाटील सोनाली यलगुंदे-पाटील यांनी सोशल मीडियाचा वापर करत त्यांचे नातेवाईकांना माहिती दिली.
याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील बेळंब गावात जिंतूर तालुक्यातील एक अनोळखी व्यक्ती गावात फिरत असताना दिसून आल्याची माहिती प्राप्त होताच पोलिस पाटील यलगुंदे यांनी तातडीने सदर इसमाचा शोध घेतली. सोनाली पाटील यांनी चौकशी करत त्यांना बोलते केले असता शामराव नाव व गाव जिंतूर असे सांगितले.
मात्र सविस्तर माहिती मिळत नसल्याने तातडीने एकुरगा गावाचे पोलीस पाटील महेशंकर पाटील यांना फोन करून व्हॉटस ॲपवर संबंधित व्यक्तीचा फोटो, त्याचे नाव, गाव व तालुका आदी माहिती देवून त्वरित चौकशी करावी व सदर व्यक्ती त्याचे कुटूंबाला मिळावा अशी विनंती केली. एकुरगा गावाचे पोलीस पाटील महेशंकर पाटील यांनी नाव, गाव व तालुका माहिती उपलब्ध पुढील काम सुकर झाले.
माहिती कळविण्याची तत्परता
सर्व माहिती दिल्यानंतर फक्त दहा मिनिटांत अशोक गोरे यांनी प्रतिसाद देत मोहाडीचे पोलीस पाटील श्री गडदे यांना दिली असता सदर व्यक्ती ही आमच्या भावकीतील असून उद्या घेवून जाण्यास आम्ही येतोय असा निरोप दिला. रात्रभर शामराव गडदे यांची व्यवस्था करून त्यांचे कुटूंबीय येई पर्यंतची सामाजिक भाव जपत जेवण, राहण्याची व्यवस्था करून माणुकीचे दर्शन घडविले. पोलीस पाटील सोनाली यलगुंदे-पाटील यांच्या कुटूंबियांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.