आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर ते उमरगा महामार्गाचे काम सात वर्षांपासून बंद आहे, यामुळे अनेकांचा अपघातात जीव गेला. २०१६ ते २०२२ पर्यंत तुम्ही झोपला होतात का, असा संतप्त प्रश्न खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महामार्गाचे कंत्राटदार व अधिकाऱ्यांना विचारला.सातत्याने मागणी करूनही महामार्गाचे काम पूर्ण केले नाही. यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी महामार्गावरील फुलवाडी टोल प्लाझा व तलमोड टोल प्लाझा येथील टोल वसुली बंद करण्याचे आंदोलन ठाकरे गटाने केेले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत बैठक आयोजित केली होती.
बैठक संपल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार स्वत:हून खासदार राजेनिंबाळकर यांच्या भेटीला आले. यावेळी आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व संबंधित कंत्राटदाराला धारेवर धरुन २०१६ पासून २०२२ पर्यंत तुम्ही काय झोपले होता का?” इतक्या दिवसात ज्या नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला, त्याला जबाबदार कोण, आणखीन किती दिवस असेच शेकडो नागरिकांचा अपघाती मृत्यू होण्याची वाट बघत बसणार, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच काम सुरू झाल्याची प्रत्यक्ष खात्री झाल्याशिवाय टोलनाके सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशाराही दिला. यामुळे अधिकाऱ्यांनी दोन तीन दिवसात काम सुरू करणार असल्याचे सांगितले.
टोल मागितल्यास सांगा
प्रवासी व वाहन मालकांनी तलमोड व फुलवाडी नाक्यात टोल देऊ नये. सक्तीने किंवा आॅनलाइन टोल वसूल होत असल्याचे आढळल्यास टोल वसूली बंद केली जाईल. टोल घेण्याचा प्रकार होत असल्यास प्रवाशांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगावे, असे आवाहन खा. ओमराजेंनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.