आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महामार्गाची कामे अर्धवट; मनसेने केला रास्ता रोको

जळकोट16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा वर्षांपासून सोलापूर, हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ चे काम रेंगाळले. वेगाने काम करुन रस्ता दुरुस्त करा, महामार्गावरील अर्धवट कामे, उड्डाणपुल, सर्विस रोड व मोठे खड्डे बुजवून त्यावर डांबरी लेयर टाकण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळकोटजवळ रास्ता रोको करण्यात आला. दीड तास हे आंदोलन चालले.

रस्त्याची अर्धवट कामे व खड्ड्यामुळे ज्यांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबीयांना २० लाख व ज्यांना दिव्यांगत्व आले त्यांना १० लाख रुपये नुकसान भरपाई द्या, ३० नोव्हेंबरपर्यंत जळकोट, अष्टमोड, येणेगुर, दाळिंब, रामपूरपाटी येथील खड्डे बुजवून डांबरीकरण करावे, नळदुर्ग बायपासचे काम जलद करा, हंगरगा रोडवर ओपनिंग ठेवावे, एमएच २५ पासिंग असणाऱ्या सर्व कमर्शियल वाहनांना टोल मधून ५० टक्के सूट द्या,आदी मागण्यांसाठी आंदोलन केले. निवेदन स्विकारण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी निवासी अभियंता महेश उटगे, प्रकल्प प्रमुख अनिल शर्मा, मंडळ अधिकारी पी. एस. भोकरे, एपीआय सिद्धेश्वर गोरे उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका आली असता रस्ता करून दिला. खड्डे बुजवून नवीन डांबरीकरणाचा लेयर ११ दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, अविनाश साळुंखे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, तुषार वराडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव, नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख, प्रमोद कुलकर्णी, रमेश घोडके, हेमंत बनसोडे, गणेश पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गरड, जयकुमार घोगरे, धनंजय मडोळे, वैभव स्वामी, अजय डांबरे, विशाल घोरपडे, आकाश पटणे, मनोज लष्करे, पिंटू सुरवसे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...