आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा:मान्यवरांच्या उपस्थितीत उमरग्यात ध्वजारोहण

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शहरासह तालुक्यात विविध शासकीय, निम शासकीय, शाळा, महाविद्यालयात आणि खाजगी संस्थेत सोमवारी (दि १५) ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय कार्यालय येथे सकाळी सव्वानऊ वाजता उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आले. यावेळी माजी खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी सभापती जितेंद्र शिंदे, स्वातंत्र्य सैनिक बलभीमराव पाटील, कैलास शिंदे, बाबूराव शहापुरे, बळीराम सुरवसे, अनिल सगर, विजय जाधव, विजय वाघमारे, प्रदीप चालुक्य,बाबा औटी, विक्रम मस्के, मधुकर बिद्री, अमर देशटवार, निखिल वाघ, तहसीलदार राहुल पाटील,नायब तहसीलदार शिवाजी कदम, रतन काजळे, एम डी पांचाळ, पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड आदी उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी ध्वज सलामी दिली. यावेळी शहरातील जिल्हा परिषद प्रशाला, भारत विद्यालय, आदर्श विद्यालय, शरणप्पा मलंग विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थींनी राष्ट्रपुरूष, महानायिकांची वेशभूषा करून या अमृत महोत्सवी सोहळ्यात सहभागी झालेले होते. शहरात तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हासत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश डी. के. अनभुले, नगर परिषदेत मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, पंचायत समिती गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संस्थाध्यक्ष अमोल मोरे यांच्या हस्ते ध्वज फडकविला. आदर्श महाविद्यालयात अध्यक्ष विनायकराव पाटील, भारत विद्यालय, आदर्श विद्यालय, शरणप्पा मलंग विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, श्री महात्मा बसवेश्वर विद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला, शिवाई चॅरिटेबल ट्रस्टच्या कॉलेज ऑफ फार्मसी, कै तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले.

बातम्या आणखी आहेत...