आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणासाठी धरणे

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणाासह इतर मागण्यांसाठी रिपाइंच्या (आ.)वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संपत जानराव, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, जिल्हा सचिव सचिन शिंगाडे, तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे, शहर अध्यक्ष उदयराज बनसोडे, शहर संघटक सचिव मुकेश मोठे, युवक नेते मुन्ना ओहाळ, युवा नेते महादेव भोसले, युवानेते आकाश इंगळे, विशाल ओहाळ, शेखर साबळे, गौतम कांबळे, शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी गायरान जमिनी कसणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय कुटुंब यांच्या नावे पाच एकर जमीन देण्यात यावी, कानेगाव येथील बुद्ध विहारच्या वादात अंकुश गायकवाड यांची आत्महत्या की हत्या, याचा तपास करावा व अॅट्रॉसिटी आणि खुनाचा गुन्हा दोषींवर दाखल करावा, तत्काळ पेट्रोल, डिझेलसह इतर वस्तूंवरील महागाई कमी करण्यात यावी, राज्यातील दलितांवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे, त्यावर तत्काळ नियंत्रण आणावे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...