आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे अनुदानासाठी धरणे; मुंबईत बेमुदत उपोषण करण्याचाही दिला इशारा

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसा अध्यापन आणि पहाटे व रात्री उदरनिर्वाहासाठी अन्य व्यवसाय करणाऱ्या विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पूर्ण अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विनाअनुदानित तथा अंशत: अनुदानित शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक यांच्यासह शिक्षकेतरांना १०० टक्के वेतन द्यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. याशिवाय घोषित, त्रुटीपात्र व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. ५ नोव्हेंबर २०११ तसेच दि. २४ जून २०१४ मधील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करुन पूर्ण १०० टक्के अनुदानासह १०० टक्के पगार सुरु करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय दि. २२ मे पर्यंत काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे. धरणे आंदोलनावेळी बी. जे. सोकांडे, सी. एम. सोनटक्के, विकास खापरे, एस. व्ही. नवरखेले, खिचडे यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...