आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण उत्साहात‎ साजरा:परंडयात होळी साजरी‎

परंडा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भवानी शंकर मंदीर,‎ राजा पुरा गल्ली, जय भवानी‎ चौकात सायंकाळी पारंपरिक‎ पध्दतीने विधिवत पूजा अर्चा करुन‎ होळीचे दहन करुन सण उत्साहात‎ साजरा करण्यात आला. होळीच्या‎ अग्नीत निराशा, आळस,‎ दारिद्रयाची आहुती देऊन सर्वत्र‎ सुख शांती, निरामय आरोग्याची‎ मंगल कामना करण्यात आली.‎ भवानी शंकर मंदिराच्या समोर‎ मुख्य पुजारी किशोर बैरागी यांनी‎ होळीची विधिवत पुजा केली.‎

शहरात विविध ठिकाणी होलीका‎ दहन करुन मोठा जल्लोष‎ करण्यात आला. होळी भोवताली‎ तरुणांनी, बालगोपाळांनी‎ शंखध्वनी करत मोठ्या आनंद‎ उत्साहात होळी सण साजरा केला.‎ घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य‎ दाखवत होलिका दहन करण्यात‎ आले. विविध ठिकाणी तसेच‎ घरोघरी आकर्षक रांगोळ्या‎ रेखाटल्या तर जय भवानी चौक,‎ काशीद गल्ली येथे नाभिक‎ संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नागेश‎ काशीद ''रा.स्व. संघाचे पर्यावरण‎ गत विधी जिल्हा संयोजक विशाल‎ काशीद यांच्या हस्ते होलिका पूजन‎ करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...