आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती व पुण्यतिथी:कळंब आणि पाथर्डी  येथे लोकमान्य  टिळक व अण्णाभाऊंना नमन

कळंब12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक जे. डी. कुपकर, उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे भवर हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील वैष्णवी घुले, अनन्या कांबळे, समृद्धी निंबाळकर, भूमी गायकवाड, श्रावणी जाधव, अर्पिता तारपे, तनिष्का पिसे, वाघमोडे आर्या, लोखंडे ज्ञानेश्वरी, शौर्य लोखंडे, खापे ज्ञानेश्वरी, गव्हाणे श्रावणी, तनुजा चौधरी यांनी आपले विचार मांडले. यावेळी विद्यालयाची आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख काकासाहेब मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्काऊट गाईड कॅप्टन प्रतिभा गांगर्डे यांनी केले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे जिवनसिंह ठाकूर, ज्ञानेश्वर तोडकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाथर्डी
तालुक्यातील पाथर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच नानासाहेब पिंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत पिंगळे, माजी सरपंच अर्जुन जाधव, पोलिस पाटील बालाजी चिंचकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, शिक्षिका आशा पवार यांनी विद्यार्थ्यांना अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याची ओळख करून दिली व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी महादेव सावंत, नवनाथ धेले, गांधारी धेले, सुनील जाधव, अमोल चिलवंत उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका मनिषा पवार, सुरेखा भावले यांनी परिश्रम केले.

बातम्या आणखी आहेत...