आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण:स्वच्छ सर्वेक्षणात’ पंढरपूर नगरपालिकेचा सन्मान ; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर नगरपरिषदेला केंद्रीय गृहनिर्माण व शहरी राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२ या सन्मानाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी स्वीकारला. यावेळेस नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, संतोष ऐतवाडकर, अभिजित घाडगे आणि शहाजी चव्हाण हे उपस्थित होते.केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने येथील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-२०२२’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणीतील सर्वोत्तम १२ पुरस्कारांचे या वेळी नवी दिल्ली येथे वितरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...