आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहभोजन:ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान; दिव्यांग-निराधारांना स्नेहभोजन

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका शिवसेनेच्या वतीने रविवारी शिवसेनेचा ५६ वा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिकांचा माजी खासदार रवींद्र गायकवाड , ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते फेटा बांधून पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. दुपारी एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी दिव्यांग, निराधार मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.

यावेळी युवा नेते किरण गायकवाड, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, माजी नगरसेवक सिद्रामप्पा चिंचोळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक विलास भगत, माजी तालुकाप्रमुख विजयकुमार नागणे, तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, बाजार समिती संचालक सचिन जाधव, सुधाकर पाटील, नरेंद्र माने, विधानसभा संघटक शरद पवार, माजी जिप सदस्य शेखर घंटे, महावीर कोराळे, बलभीम येवते, आप्पाराव गायकवाड, लिंगराज स्वामी, खय्यूम चाकूरे, राजू कारभारी, संतोष सगर, संदीप चौगुले, अमर शिंदे, हणमंत शिंदे, धैर्यशील सूर्यवंशी, शफी चौधरी, काका गायकवाड, मारुती थोरे, प्रशांत पोचापुरे, महादेव बिराजदार, गोपाळ जाधव, प्रदीप शिवनेचारी, तुळशीदास चौगुले, राजू कुनाळे, बळी गायकवाड, व्यंकट पाटील,युवराज गायकवाड, विजय कदम, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सोमवारी (दि.२०) शहरातील जिजामाता प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना किरण गायकवाड यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...