आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवाई चॅरिटेबल ट्रस्ट्स कोरेगाववाडी येथील कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाई इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे बुधवारी (दि ८) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना पुष्प देऊन स्वागत केले. आधुनिक युगातील स्त्री विषयावर विविध पोस्टर्स विद्यार्थ्यांनी लावले. तसेच पाककला स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. यात निकिता सावळकर,पुनम भोसगे, सानिया मुल्ला यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवीला.या स्त्रीशक्ती,महिला सबलीकरण स्त्रियांचे समाजातील स्थान या विषयावर आपलं मत व्यक्त केलं. अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासह आदर्श उपस्थित केले आहेत.
सर्व क्षेत्रात महिला वर्चस्व गाजवत आहेत. समाजात होणाऱ्या अत्याचाराविरोधात सक्षमतेने महिलांनी तोंड दिले पाहिजे असे मत प्राचार्य महेश कदारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा अजय बेडदुर्गे, प्रा सुधाकर जाधव, प्रा अश्विनी सुर्यवंशी, प्रा वैष्णवी इंडे, प्रा वैष्णवी फुगटे, प्रा सुनंदा सोलनकर, प्रा प्राजक्ता ननवरे,प्रा अश्विनी मुडमे यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कळंब आयटीआय
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक वर्षा साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.