आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव‎:मैदानी स्पर्धेत विशेष कामगिरीबद्दल‎ ग्लोबलच्या विद्यार्थ्यांचा गौरव‎

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎ येथील ग्लोबल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत ‎ ‎ उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने गौरव ‎ ‎ करण्यात आला.‎ क्रांती करियर अकॅडमी येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत‎ १४ वर्षे वयोगटातून ग्लोबल विद्यालयाची आठवीतील विद्यार्थिनी निकिता झिरपे हिने गोळाफेक मध्ये प्रथम‎ क्रमांक पटकावला. इयत्ता नववीतील प्रांजली मारकड‎ हिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय, इयत्ता आठवीतील साक्षी गावडे हिने १०० मीटर धावण्याच्या‎ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. ४ बाय १०० रिले स्पर्धेत‎ ग्लोबल विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला.

१७ वर्षे‎ वयोगटातून तीन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत इयत्ता‎ अकरावीतील विद्यार्थिनी रोहिणी मेहेर हिने प्रथम क्रमांक‎ पटकावला. आरती पोळ हिने तृतीय क्रमांक पटकावला.‎ १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पूजा तिंबोळे हिचा प्रथम‎ क्रमांक आला. ४ बाय १०० रिले स्पर्धेत ग्लोबल ज्युनिअर‎ कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षे वयोगटातून‎ इयत्ता अकरावीची विद्यार्थीनी श्रुतिका जाधव हिने‎ थाळीफेक स्पर्धेत द्वितीय, इयत्ता नववीची तनुजा गटकुळ‎ हिने भालाफेक स्पर्धेत प्रथम, ऋतुजा गटकुळ हिने‎ भालाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच १९‎ वर्षे वयोगटातून १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत श्रुती‎ कोलते हिने प्रथम क्रमांक व साक्षी तिंबोळे हिने द्वितीय‎ क्रमांक पटकावला.

२०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत श्रुती कोलते हिचा प्रथम तर अंकिता गटकुळ हिचा द्वितीय‎ क्रमांक आला. ८०० मीटर धावण्यात प्रतीक्षा घोगरे हिने‎ तृतीय क्रमांक व १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत इयत्ता‎ अकरावीची विद्यार्थिनी रोहिणी मेहेर हिने द्वितीय क्रमांक‎ व अंकिता गटकुळ हिने तृतीय क्रमांक पटकावला.‎ थाळीफेक स्पर्धेत भाग्यश्री कोलते प्रथम क्रमांक, प्रतीक्षा‎ घोगरे द्वितीय आली. लांब उडीमध्ये श्रुती कोलते प्रथम‎ क्रमांक व साक्षी तिंबोळे द्वितीय आली. ४ बाय १०० रिले‎ स्पर्धेत १९ वर्षे गटातून प्रथम क्रमांक मिळवला.

सर्व‎ यशस्वी खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात कौशल्य‎ दाखवून यश संपादन केल्यामुळे प्रशालेचे क्रीडा शिक्षक‎ रामेश्वर चोबे व शाहीन हन्नुरे यांचा संस्थेचे संस्थापक‎ अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव आशा मोरजकर‎ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ग्लोबल‎ एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या, मुख्याध्यापिका,‎ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...