आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३ डिसेंबर २०२२ रोजी प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने होतकरू स्वावलंबी व प्रेरणादायी अशा २४ दिव्यांग बांधवांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते स्वावलंबन प्रेरणा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, दिव्यांगांनी स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबी जीवन जगले पाहिजे, इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे यासाठी आपण आत्मनिर्भर बनलं पाहिजे, कुठलेही क्षेत्र असो त्यामध्ये आपण स्वावलंबी जीवन जगला पाहिजे. वयोश्री योजनेचा लाभ लवकरच देणार आहोत, असे त्यांनी सांगितले व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, प्रमुख पाहुणे मारुती मुंडे, सहप्रभारी भाजप दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान मते, जिल्हाध्यक्ष भाजपा दिव्यांग विकास आघाडी, धाराशिव महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगडे, महिला मोर्चा उपजिल्हाध्यक्ष विद्याताई माने, विठ्ठल गायकवाड, जोशीलाताई लोमटे, जिल्हा संघटक नारायण साळुंखे, जिल्हा सरचिटणीस उत्तम शिंदे, जिल्हा सदस्य महादेव बारस्कर, उपस्थित होते.न्रतर आभार मानण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.