आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातून भव्य मिरवणूक:काशीपीठाचे जगदगुरू डाॅ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज यांचा सत्कार

तुळजापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काशीपीठाचे नूतन जगद्गुरू डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी जगद्गुरुंची शहरातून भव्य मिरवणूक - अड्डपालखी काढण्यात आली.वीरशैव जंगम मठ व लिंगायत समाजाच्या वतीने शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालयात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवानंद शिवाचार्य महाराजांसह आ. राणाजगजितसिंह पाटील, आ.विजयकुमार देशमुख माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काकासाहेब कोयटे, सुनिल रूकारी, बसवराज मंगरूळे, रामचंद्र आलुरे, स्वागताध्यक्ष राजेंद्र मुंडे, आप्पासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी स्वामी आदींची उपस्थिती होती.

तत्पूर्वी सकाळी १० वाजता काशी जगदगुरू यांचे वीरशैव जंगम मठात आगमन होताच शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांची भव्य मिरवणूक (अड्डपालखी) काढण्यात आली. मिरवणूकीत भजनीमंडळानी मृदंग, टाळ - मृदंगासह भजनी मंडळ, गोंधळी, हलग्या, बँड सह हजारो भक्त अड्डपालखी गुरूवंदना करत सहभागी झाले होते. दुपारी २ वाजता मिरवणूकी चे शिवपार्वती मंगल कार्यालयात आगमन झाले.या वेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, प्रथमेश हंगरगेकर, सौ.सुवर्णा मुंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रस्तावना गुरूनाथ बडुरे यांनी तर सुत्रसंचालन श्वेता हल्ले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...