आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनंदन:परंड्यात मंथन परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; विकास कुलकर्णी यांचे मार्गदर्शक

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कल्याणसागर समूहातील सरस्वती प्रा. शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयातील मंथन परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. मंथन परीक्षेत इयत्ता पाचवीतील अनुष्का सुरवसे केंद्रात द्वितीय, सहावीतील सुदर्शन गरड केंद्रात प्रथम, संस्कार घोगरे केंद्रात द्वितीय, इयत्ता सातवीतील अथर्व देशमुख, केंद्रात प्रथम राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी-उत्कर्ष कोठावळे-१२१ गुण, प्रणव सांगळे याने ११७ गुण मिळवले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक किरण गरड व शिक्षक मुकुंद भोसले, चंद्रकांत तनपुरे, महादेव नरुटे, अजित गव्हाणे, रोहित रासकर, रजनी कुलकर्णी, भारत थिटे, सचिन शिंदे, नरसिंह सोनवणे, हरि पवार, अमोल कोकाटे, प्रशांत कोल्हे, गणेश पवार व कर्मचारी संतोष माळी, बापू गायकवाड, सतीश चौधरी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे कल्याणसागर समूहाचे अध्यक्ष माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, कल्याणसागर समूहाच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...