आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशांतिदूत परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने रविवारी (२) जकेकुर-चौरस्ता ओम लॉन्स येथे तालुका व परिसरातील विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त ७५ प्रयोगशील व सेंद्रिय शेती विकसित करणाऱ्या शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. राज्याचे माजी विशेष पोलिस निरीक्षक विठ्ठलराव जाधव, शांतीदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्या जाधव, राज्याचे कृषी सहसंचालक डॉ तुकाराम मोटे, शेतकरी दूत परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय ठुबे, राज्याध्यक्ष विजय बोत्रे, कार्याध्यक्ष विकास देशमुख, तहसिलदार बालाजी शेवाळे पुणे, माजी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अशोक क्षीरसागर, पोलीस निरीक्षक मनोज राठोड, दिपक जवळगे यांच्या उपस्थित आणि उद्योजक संजय मुटकुळे यांचे अध्यक्षतेखाली शेतकरी गुणगौरव मेळावा संपन्न झाला.
यावेळी शेतीसाठी लागणारे सेंद्रीय बी-बियाणे, अवजारे व महिला गटामार्फत उत्पादित वस्तुंचे स्टॉल विक्रीस ठेवण्यात आले होते. बळीराजाच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे त्याचा सन्मान व्हायला पाहिजे व कौतुक व्हायला पाहिजे म्हणून यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शालेय शिक्षणाचे साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात बळीराजा कवी संमेलनाचे आयोजन करत बळीराजाच्या सुखदुःखाच्या भावना या काव्यसंमेलनाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. रसिकांनी कवी संमेलनाला भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी धानोरीच्या विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लाठी खेळाचे प्रात्यक्षिक केले.यावेळी ठेवण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील शेतीउपयोगी उपकरण सहभागी शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.