आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पाऊल उचलले आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्हाभर कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांची तपासणी करण्यासह दंड व हॉटेल, लॉज ची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दरोडे, चोऱ्या, घरफोडी या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने जिल्हाभरात सर्व पोलिस ठाणे स्तरावर मंगळवारी २१ जून रोजी पाच ते ११ वाजेदरम्यान ऑलआउट व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी जिल्ह्यातील २४८ माहितगार गुन्हेगारांची, कारागृहातून जामीनावर सुटलेले ४७ आरोपी, ६५ हिस्ट्रीशीटर, ६६ फरारी आरोपी, पाहिजे असलेला एक आरोपी, एक तडीपार आरोपी तपासण्यात आले. नाकाबंदी दरम्यान १०३ वाहने तपासून कारवाई करुन ४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच १०२ वॉरंट बजावणी करण्यात आली. तसेच ७१ लॉज- हॉटेल तपासण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.