आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरींचे विसर्जन:तेर परिसरात घरोघरी लक्ष्मी पूजन, भावूक वातावरणात निरोप

तेर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरवासीण म्हणून तीन दिवस राहणाऱ्या महालक्ष्मींचे शनिवारी उत्साहात आगमन झाले होते. सोमवारी (दि.५) महालक्ष्मींना भावूक वातावरणात निरोप देण्यात आला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तेर येथील घरीही महालक्ष्मींचे विधिवत पूजन करुन निरोप देण्यात आला. तेरसह ग्रामीण भागात खेडोपाडी रविवारी (दि.४) घरोघरी लक्ष्मीपूजन सोहळा पार पडला. यावेळी पुरणपोळी व १६ भाज्यांचा नैवेद्य दाखवून महालक्ष्मींचे पूजन करण्यात आले. महालक्ष्मींना सजवण्यासाठी अनेक प्रकारचे दागिने, विविध मूर्ती, खेळणी खरेदी करत महिलांनी हा सण साजरा केला. महालक्ष्मीसमोर आकर्षक रांगोळी काढून, सुवासिक फुलांच्या माळा व वनस्पतींची रोपे एकत्र बांधून सजावट केली होती. तसेच रुढीप्रमाणे महालक्ष्मीच्या मूर्तींना साडी नेसवून विविध अलंकारांनी सजवून, विविध मिठाई, खेळणी, फळे व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी नैवेद्य दाखवून सहकुटुंब पूजा-आरती करण्यात आली. लक्ष्मी विसर्जनानिमित्त अर्चनाताई पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तेर येथील घरीही हळदकुंकू सोहळा घेऊन तीन दिवस माहेरवासीन म्हणून राहिलेल्या गौरींचे विसर्जन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...