आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्ठेने काम करणार:शिवसेनाप्रमुख व हिंदुत्वाला शिव्या देणारे प्रबोधन कसे करणार?

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख, हिंदुत्वाला शिव्यांची लाखोली वाहणारे शिवसैनिकांचे प्रबोधन कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करून बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते अनिल खाेचरे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान समजले जाणारे अनिल खोचरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ पकडली आहे. मुंबईत प्रवेश केल्यानंतर खोचरे यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा समाचार घेतला.

ते म्हणाले की, जो लोक पूर्वी खुद्द शिवसेनाप्रमुख व हिंदूत्वाविषयी अपशब्द बोलत होते. आता ते शिवसैनिकांचे काय म्हणून प्रबोधन करणार ? त्यांच्या नाटकीपणाला सच्चे शिवसैनिक व शिवसेनेवर प्रेम करणारे कधीही भुलणार नाहीत. आम्ही शिवसेनेमध्ये पूर्ण हयात घालवली. ते आता येऊन आम्हाला ज्ञान कसे शिकवणार, असा प्रश्न उपस्थित करून खाेचरे म्हणाले की, गेल्या १५ वर्षांमध्ये अनिल खोचरे वरिष्ठांना केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसत होता. मला केवळ उमेदवार निवडूण आणण्याची जबाबदारी देण्यात येत होती. परंतु, वैधानिक पद मागितले की, केवळ समजावण्याची भूमिका घेण्यात आली. आतापर्यंत मी खूप संयम पाळला. आता खूप विचार करून एकनाथ शिंदे यांना साथ देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मला कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. तरीही मी निष्ठेने पक्षात काम करणार आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती पत्रकार परिषदेला केवळ खोचरे एकटेच उपस्थित होते. मात्र, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख किंवा कोणतेही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित नव्हते. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मी माझी भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, स्थानिक पदाधिकारी बैठकीला गेल्याचे सांगितले. तसेच त्यांना अडगळीत टाकणारे कोण आहेत, याबाबत विचारले तर त्यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले.शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये नवे नेते व कार्यकर्ते सध्या येत असून पुढे काय, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...