आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारातून प्रकाशाकडे नेणारा पोत:तीन तास शेकडाे आराधींनी खेळवला पाेत

लतीफ शेख | नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गचा नवरात्राेत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. अंबाबाई मंदिरातून दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सीमोल्लंघन साेहळा पार पडला. शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात शेकडाे आराधींनी तीन तास जवळपास दीड किलाेमीटर अंतरापर्यंत पारंपरिक पाेत खेळवला. या पालखीसमोर आराधी मंडळांनी देवीची गाणी सादर करत, देवीचा पारंपरिक पोत नाचवत देवीचा जागर केला.

अंधारातून प्रकाशाकडे नेणारा पोत : अंधाराचा नायनाट करत प्रकाशमय वाट मिळावी, यासाठी पूर्वीच्या काळापासून पोत वापरला जात असल्याचे तुळजाभवानी मातेचे पुजारी नागनाथ भांजी यांनी सांगितले. ते म्हणाले, पूर्वीच्या काळात प्रकाशाचे साधन म्हणून ज्योत किंवा पोतचा वापर होत होता.

बातम्या आणखी आहेत...