आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मंगळवारी (६) सायंकाळी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने हुतात्मा स्मारकापासून शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य कँडलफेरी काढून अभिवादन करण्यात आले.महापरिनिर्वाण दिनानिमित्त सायंकाळी हुतात्मास्मारका पासून ते राष्ट्रीय महामार्गावरून नगर पालिकेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत फेरी काढून महापरिनिर्वाण दिन हजारो मेणबत्ती लावून अभिवादन केले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन भन्ते सुमंगल यांचे हस्ते करण्यात आले. ॲड. हिराजी पांढरे, ॲड. मल्हारी बनसोडे, श्रीधर सरपे यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून फेरीचा शुभारंभ करण्यात आला.महापरिनिर्वाण दिन निमित्त शहरातील मुख्य रस्त्याने हजारोबांधव हातात मेणबत्ती घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत ही फेरी निघाली होती.या फेरीचे नेतृत्व जीवनदादा सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, बोध्दाचार्य मिलिंद डोईबळे, तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर फेरी येताच भन्ते सुमंगल यांनी पाली पूजा घेतली. समता सैनिकांच्या जवानांनी मानवंदना दिली.
यावेळी भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे, प्रभाकर गायकवाड, किरण कांबळे, उमाजी गायकवाड, रामभाऊ गायकवाड, अविनाश भालेराव, माजी सैनिक सुभाष काळे, सुधीर कांबळे, दिलीप सुरवसे, फुलचंद कांबळे, राजरत्न सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, प्रदीप कांबळे, आनंदराज कांबळे, दिलीपदादा गायकवाड, त्रिशला गायकवाड, विद्या कांबळे, रंजना सुरवसे, सविता कांबळे, झुंबर गायकवाड, केरुताई सूर्यवंशी, फुलबाई कांबळे, शितल गायकवाड यांच्यासह शहर व तालुक्यातील एकूरगा, औराद, मुळज, गुगळगाव, एकोंडी, कराळी, माडज यासह सामाजिक कार्यकर्ते शुभ्रवस्त्र परिधान करून फेरीत सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.