आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ५) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे कोंड (ता. उस्मानाबाद) येथे तब्बल पाच तास तणावाचे वातावरण होते.
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाती सतीश तिवारी परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिचा विवाह कोंड येथील सतीश कवरसिंग तिवारी यांच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्यही आहेत. सतीश तिवारी पत्नीसोबत ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी निवासस्थानात राहत होते. मात्र, मागील तीन वर्षांपासून सतीश व त्याची पत्नी स्वाती या दोघांमध्ये वाद सुरू होता. सतीश यांचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. दरम्यान, ३१ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानात सतीश गेले असता त्यांना तेथे ढोकी येथील विवेक देशमुख व स्वाती हे एकत्र असल्याचे संशयास्पदरित्या दिसले. त्यावरून सतीश याने त्या दोघांना जाब विचारला.
तेव्हा वाद होऊन सतीश यांना पत्नी स्वाती व तिचा प्रियकर देशमुख या दोघांनी मिळुन बेदम मारहाण केली. दरम्यान, सतीश याने ढोकी पोलिस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल केली आहे. सतीशन पत्नीला वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ती त्यांचे ऐकत नसल्याने सतीश याने हा मानसिक त्रास सहन न झाल्याने कोंडजवळच्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीश तिवारी यांचा भाऊ उमेश कवरसिंग तिवारी यांनी ढोकी पोलिस ठाण्यांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यता आला आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बुद्धेवार अधिक तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.