आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपध्ये मी मागील ३५ वर्षांपासून निष्ठेने काम करत आहे. माझ्या मुलाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्याच्या निर्णयाशी माझा संबंधी नाही. मी भाजपमध्ये होतो आणि भाजपमध्ये राहणार, असे स्पष्टीकरण भाजपचे उमरगा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. कैलास शिंदे म्हणाले की, मी तरुण वयापासून भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. कठीण परिस्थितीत पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. पक्षाने संधी दिल्याने उमरगा-लोहारा तालुका पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले. तालुक्यात अनेक नेते व कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. मुलगा दिग्विजय शिंदे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु त्या निर्णयाशी माझा संबंध नसून तो त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. मला भाजपने विधानसभा निवडणुकीत संधी दिली होती. जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा परिषदेतही संधी दिली आहे. पक्षाने मला भरभरुन दिले आहे, मी पक्षासाठी कायम काम करत राहणार. पक्ष संघटन व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सक्रिय काम करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.