आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल्यांकन:112 गावांत आरोग्यासाठी आदर्श गाव स्पर्धा, पहिल्यांदाच 28 प्रकारांचे मूल्यांकन

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या अंतर्गत आता १२२ गावांमध्ये आरोग्यासाठी आदर्श गाव मोहीम संकल्पना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच या गावात दिल्या जाणाऱ्या आरोग्याच्या २८ प्रकाराचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व गावांमध्ये मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा अधिक लाभ ग्रामस्थांना होणार असून सेवेचा दर्जाही अधिक वाढणार असल्याचे आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

शासन स्तरावरून ही मोहीम राबवण्यात येेत असून यासाठी प्रारंभी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांना या गावांची निवड करायची आहे. त्यानुसार जिल्ह्यात ठरवून दिल्यानुसार ११२ गावांची निवड करण्यात आली आहे. यातून आरोग्य विभागातून शासनाचे विविध कार्यक्रम, मोहीम यासह स्थानिक स्तरावर होत असलेल्या उपाय योजना आणि देण्यात येणाऱ्या २८ प्रकारच्या सेवांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी डिसेंबर २०२१ ते जुलै २०२२ पर्यंत कालावधीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. गावांची निवड करण्यासाठी विविध स्तरावर गुणांकन ही ठरवून दिले आहेत. त्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा सन्मान करण्यात येणार आहेत.

उपकेंद्र असलेल्या गावांना निवडीत प्राधान्य
जिल्ह्यात गावांची निवड करताना जेथे उपकेंद्र आहेत, अशा गावांना प्राधान्य दिले. इतर गावांची निवड सरसकट केली. त्यामुळे या गावांमध्ये आरोग्याच्या सुविधांचा दर्जा वाढून वेळेवर चांगली सुविधा मिळेल. तसेच यातून चांगले काम करणाऱ्या गावांचे कौतुकही करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य उपक्रमात अधिक चांगले काम करण्यात येत आहेत. त्यात जिल्हा अग्रेसर आहेच. या उपक्रमामुळे अधिक चांगली सेवा होईल.
डॉ. शिवकुमार हालकुडे, आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी.

या प्रमुख आरोग्य सेवेचे मूल्यांकन
जननी सुरक्षा योजना, संस्थात्मक प्रसुती, किशोरवयीन मुलींची तपासणी, प्रसुतीपूर्व चार तपासण्या, बालकांच्या तपासण्या, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, हिमोग्लोबिन कमी आढळलेल्या किशोरवयीन मुली व बालक, नऊ ते ११ महिन्याचे लसीकरण, ३० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे एनसीडी स्क्रिनिंग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग निदान- उपचार, दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिलेले लाभार्थी, कुष्ठरोग निदान-उपचार, क्षयरोग निदान-उपचार, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी केलेल्यांची संख्या.

बातम्या आणखी आहेत...