आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:कल्पकतेस सकारात्मक दिशा मिळाल्यास व्यक्तीत परिवर्तन ; कमलाकर भोसलेंचे मार्गदर्शन

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत शिक्षण संस्था संचालित येथील भारत विद्यालयात गुरुवारी गणेश व्याख्यानमालेत गुरुवारी (दि.१) पहिले पुष्प गुंफण्यात आले. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक कमलाकर भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक शाहूराज जाधव अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक संजय देशमुख उपस्थित होते. कमलाकर भोसले ‘श्यामची आई’ विषयावर बोलताना म्हणाले की, मुलांना आईचे महत्त्व सर्वाधिक माहिती असते. स्वभानातून निर्माण होणारी कल्पकता, विचारशैली, सकारात्मक दिशेने गेली तर व्यक्तीत परिवर्तन होते. राष्ट्रपुरुषांनी स्वभानातून समाजभानाची जाणीव ठेवून कार्य केले. तरुणाईत स्वभानातून समाजभान जागृत व्हावे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगून ध्येय साध्य करावे. साने गुरुजींचा जीवनपट व त्यांचे कार्य, श्यामची आई पुस्तकातील कथा ‘अक्काचे लग्न’ यावर मार्गदर्शन केले. भोसले यांनी सांगितलेल्या कथेतून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारुन उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली. साने गुरुजींच्या कथा संस्कारक्षम व मार्गदर्शक असल्याचे मत मुख्याध्यापक शाहुराज जाधव यांनी व्यक्त केले. सहशिक्षक व्यंकट गुंजोटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

तलमोड विद्यालयात व्याख्यान
तालुक्यात तलमोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमालेत गुरुवारी (दि.१) जेकेकूरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्याध्यापक जयवंत मोरे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन व प्रतिमा पूजन झाले. ‘आजचा युवक व भारताचे भविष्य’ विषयावर बोलताना सरपंच सूर्यवंशी म्हणाले की, आजचा युवक निश्चितच उत्साही आहे. पुष्कळदा असेही वाटते की आजची तरूणाई ही विधायक कार्यासाठी का पुढाकार घेत नाही. याचा शोध कोण घेणार? तरुणांना स्वतःलाच समजून घ्यायला हवे. आजची तरूणाई जागृत व जागतिकीकरणाविषयी सतर्क असून विधायक कार्य करत आहे. शहीद भगतसिंग एके ठिकाणी म्हणतात ‘यौवनकाल मानवी आयुष्यातील वसंत ऋतु आहे. तारुण्याच्या प्राप्तीने माणूस बेभान होतो. हजारो प्याले घेतल्यासारखी नशा चढते. युवकाने ठरवले तर तो काहीही करू शकतो. गरज आहे ती तरुणांमधील आत्मभान जागृत करण्याची. सहशिक्षक जितेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन तर नितीन राठोड यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...