आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:कौटुंबिक वातावरण जर सुरक्षित राहिले तर देशही सुरक्षित राहतो; आचार्य ज्युतिंधर यांचे विचार

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले कुटुंब म्हणजे व्यक्ती विकासाची एक कार्यशाळा आहे. घरात होणारे संस्कार मुलांचे विकास होण्यास मोलाचे आहेत. धावपळीच्या युगात आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पालकांची आहे. कौटुंबिक वातावरण सुरक्षित राहिल्यास समाजासोबत देशही सुरक्षित राहतो. प्रत्येकांनी कुटुंबातील जबाबदार सदस्य होत समाज एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत पुणे येथील आचार्य ज्युतिंधर यांनी व्यक्त केले.

त्रिरत्न बुद्धिष्ट सेंटरच्या वतीने शहरातील गुंजोटी रोड लगत बहुजन हिताय वसतिगृहात रविवारी (दि. ३) आयोजित कौटुंबिक कार्यशाळेत उपस्थित पालकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी धम्मचारी संघभद्र पुणे, त्रिरत्न बौद्ध महासंघ लातूर चेअरमन धम्मचारी कल्याणदस्सी, चेअरमन धम्मचारी रत्नपालीत (उस्मानाबाद), सोलापूरचें धम्मचारी करुणादित्य, धम्मचारी ज्ञानपालीत, धम्मचारी ज्ञानसंवर, धम्मचारी विबोध, धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी प्रज्ञाजीत आदी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात नूतन धम्मचारीचा सत्कार करण्यात आला.

दुपारचे सत्रात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आचार्य ज्युतिंधर यांनी आपल्यास विचारांनी खिळवून ठेवले होते. स्त्री पुरुष समानता, सुसंवादित वाणी, मैत्रीभाव एकमेकांच्या प्रति मैत्री, वडीलधाऱ्यांचा आदर, मुलांच्यावर योग्य संस्कार आदी विषयावर मार्गदर्शन करत ते म्हणाले की, कुटुंबाचे तीन स्तर होतात. त्यात अविकसित, विकसनशील व विकसित असे भाग असतात. आपण समाजात जीवन जगताना विकसित होत असतो व त्यातून आपली जडणघडण होते. समाजातील आदर्श कुटूंब हेच समाजाला दिशादर्शक असू शकते. सध्या घराघरात कलह वाढत चालले आहेत. आपल्या चुकीची कबुली देवून प्रोत्साहन दिले पाहिजे तेव्हाच आपले कुटुंब चांगले राहू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे वडील रामजी सुभेदार यांनी बालपणी केलेल्या संस्काराचे बळावर बाबासाहेबानी महान कार्य करून जगासमोर वेगळा आदर्श निर्माण केला. बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून आपले कुटुंब सुधारल्यास समाज सुधारेल असे म्हणाले. प्रारंभी तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. संघंमित्रा सुनीता कांबळे यांनी बुद्ध पूजा घेतली. यावेळी भंते विबोध, धम्मभूषण, रत्नपालीत, ज्ञानपालीत यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी कल्याणदस्सी यांनी केले.

समाजात मोठ्यांचा आदर ठेवणे गरजेचे
कुटुंबातील सदस्यांचे रक्षण करण्यासाठी आचार-विचार व मन शुद्ध ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांचा मानसन्मान करीत प्रेमाची वागणूक दिली पाहिजे, लहान मुलांचे कौतुक केले पाहिजे तर मोठ्याचा मानसन्मान ठेवला पाहिजे, असे विचार मांडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...