आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाज आक्रमक:आरक्षण नाही तर मग मतदानही नाही ; ग्रामपंचायत निवडणुकीनंतर काढणार महामोर्चा

तुळजापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षण मुद्यावर तरुणांच्या तीव्र भावना आहेत. मात्र, मराठा आरक्षण आंदोलनाचा वापर राजकीय हितासाठी होत आहे. त्यामुळे यापुढे आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजाचा बैठकीत घेण्यात आली. दरम्यान, होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही भुमिका घेण्यावर यात चर्चा झाली. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मराठा आरक्षण महामोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला. येथील शासकीय विश्रामधाम येथे शनिवारी सकल मराठा समाजाची बैठकीत चळवळीला वेगळी दिशा देणारा महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मराठा आरक्षणासाठी इडब्ल्यूएसच्या दहा टक्के वाढीव आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेण्यासह अनेक राज्यात आरक्षण मर्यादा यापूर्वीच पन्नास टक्क्यांवर गेल्याने ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणे प्राथमिकता असावी अशी भूमिका मांडण्यात आली. सध्या ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहित लागू असल्याने ग्रापं. निवडणुकीनंतर महामोर्चा काढण्याचा निर्णय झाला.

महिलांना जबाबदारी
बैठकीला मराठा महिलांची मोठी संख्या होती. शक्ती देवता कुलस्वामिनी तुळजाभवानी माता दरबारात निघणाऱ्या महामोर्चात महिलांना जबाबदारी देण्याची मागणी महिलांनी केली. महामोर्चा आयोजनात महिलांचा सहभाग वाढवण्याची मागणी महिलांनी केली. त्यासही समितीकडून सकारात्मक चर्चा करण्यात आली.

ग्रापं. निवडणुकीतही नाही
आतापर्यंत मराठ्यांनी ५८ विक्रमी मोर्चे काढले. अनेक हुतात्मे होऊनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालावा लागेल. तसेच आरक्षण मिळण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची भूमिका असणार आहे.
-सतीश खोपडे, सकल मराठा समाज कार्यकर्ते.

बातम्या आणखी आहेत...