आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवचन:झाडे लावा, जगवा तरच भविष्यात तापमानाचा उच्चांक होणार नाही ; प्रबोधन कीर्तनकार निवृत्तीनाथ इंदुरीकर महाराज यांचे जळकोट येथे प्रवचन

जळकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात फार मोठ्या तापमानाला सामोरे जावे लागणार आहे, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांनी केले. गणेश सोनटक्के व मित्रपरिवार यांच्या वतीने सर्वधर्मीय १४ महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रथमतः महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, संत सेवालाल महाराज यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कीर्तनाला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती विशेषत: महिलांची अलोट गर्दी होती.उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार राणा दादा पाटील यांनी ५१० कोटी रुपयांचा विमा मिळवून दिल्याबद्दल आमदाराचे प्रतिनिधी म्हणून आमदार पुत्र मल्हार पाटील यांचा झेडपीचे माजी सदस्य गणेश सोनटक्के व इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते बैलगाडीची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला. या कीर्तन सोहळ्यास तमण्णप्पा माळगे, अस्मिता कांबळे, संतोष बोबडे, ॲड. दिपक आलुरे, दत्ता राजमाने, महादेव पाटील, माजी उपसरपंच बंकट बेडगे, संजय माने, संजय अंगुले, ॲड आशिष सोनटक्के उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...