आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थिदशेतच आपल्याला भविष्यात काय व्हायचे आहे हे प्रत्येकाने ठरवायला हवे. त्यासाठी अभ्यास व परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, मुलांच्या आयुष्यात यशापर्यंत पोहोचण्यासाठी आज सर्वात मोठी बाधा मोबाइल ठरत आहे. परंतु, भविष्यात स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर वर्तमानात मोबाइलपासून स्वत:ला दूर ठेवा, असा सल्ला वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी विद्यार्थ्यांना दिला. बजाजनगर येथील राजा शिवाजी महाविद्यालयात १६ डिसेंबर रोजी ‘महिला बाल सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन’ शिबिर घेण्यात आले. त्या वेळी ते बाेलत हाेते. या वेळी ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला हाेता. प्राचार्य डॉ. एस. एस. कादरी अध्यक्षस्थानी हाेते. पोलिस उपनिरीक्षक स्वाती राऊत यांची उपस्थिती होती.
गुड टच, बॅड टचवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या फिट राहावे, असा सल्लाही गुरमे यांनी या वेळी दिला. पोलिस उपनिरीक्षक राऊत यांनी गुड टच, बॅड टचविषयी मुलींना माहिती दिली. जयश्री शेजूळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विलास मालोदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कैलास मोरे, विद्या उगले, अनिता बोबडे, शारदा खरात, रंजना बावचे, अशोक जगताप, गोपीचंद गायके आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.