आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री सर्रास सुरू; पोलिसांच्या कारवाईत 14 जणांवर कारवाई

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्यनिर्मिती आणि विक्री वाढत चालली आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी दिवसभरात विविध ठिकाणी छापे टाकून १२ जणांवर गुन्हे दाखल केले. विविध पोलिस ठाण्यातील पोलिसांनी जिल्हाभरात छापे मारुन छाप्यातील अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. त्यात अंबी पोलिसांना कोकरवाडी, ता. परंडा येथे महादेव गावडे व महादेव कदम हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी ४७ बाटल्या देशी दारु बाळगलेल आढळले.

बेंबळी पोलिसांना शिवहार कांबळे हे खामसवाडी शिवारात १५ बाटल्या देशी दारु, सायबी पवार या विठ्ठलवाडी येथील आपल्या शेतात १५ लि. हातभट्टी दारु तर गोपीनाथ सुरवसे हे लासोना गावातील एका हॉटेलसमोर ३८ बाटल्या देशी- विदेशी दारु बाळगलेले आढळले.शिराढोण पोलिसांना ताई काळे या गोविंदपुर शिवारात १० लि. हातभट्टी दारु तर शितल काळे या बोरगाव (बु.), ता. कळंब येथील आपल्या घरासमोर १० लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या आढळल्या. कळंब पोलिसांना तोळाबाई पवार या शेळी बाजार मैदान, कळंब येथील पत्रा शेडसमोर गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत ३२५ लि. हातभट्टी दारु व ४ लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

मुरुम पोलिसांना तात्याराव सरवदे हे मुरळी येथील आपल्या घरासमोर १० लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले. तामलवाडी पोलिसांना राकेश मोटे हे गोंधळवाडी शिवारात ४८ बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.\उस्मानाबाद (श.) पोलिसांना विकास पवार हे देशपांडे स्टँड, उस्मानाबाद येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. १३ सीझेड ५०६४ वरुन ५० लि. हातभट्टी दारु अवैधरित्या वाहनू नेत असताना आढळले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास वडगाव (सि.), ता. उस्मानाबाद येथील कल्याण कांबळे हे इंडीका कार मधून ५९ बाटल्या देशी- विदेशी दारु अवैधरित्या वाहून नेत असताना आढळले.

बातम्या आणखी आहेत...