आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:शेतमालाची अवैध खरेदी, बाजार समितीकडून दुकानांची तपासणी

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ग्रामीण भागात अनेकांनी विना परवाना आडत सुरू करून शेतमाल खरेदी सुरू केल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी खामसवाडी येथे दप्तर तपासणी केली.

यामध्ये अनेकांकडे बाजार समितीचा परवाना आढळून आला नाही. याबाबतचे पंचनामे करण्यात आले असून कच्चे बुक ताब्यात घेतले आहेत. तसेच खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध आडत व्यापाऱ्यांचे

विनापरवाना माल खरेदी करणाऱ्यांवर होणार कारवाई
कळंब तालुक्यात खामसवाडी, इटकूर, येरमाळा, शिराढोण यासह विविध ठिकाणी अनेक जण शेतमाल खरेदी करत आहेत. यातून दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याकडे बाजार समितीचे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष होते. अखेर बाजार समितीने ग्रामीण भागात विना परवाना शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विनापरवाना शेतमाल खरेदीवर अंकुश बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...